Friday, 9 June 2017

ती साथ सोडून गेली...


ती साथ सोडून गेली...

वादळाच्या लक्षणावर 
ती साथ सोडून गेली...
मी बोलून थकलो जेव्हा 
ती रुजवात सोडून गेली...



मी चार प्रेमपत्रे घेऊन हातात,
आयुष्य हरवून बसलो...
नव्या स्वप्नांना आजमावयाला
ती मुलाकात सोडून गेली...


वचनांची सोडून कास,
आस सप्तपदीची विरली...
जेव्हा निष्फळ लग्नाची बोलणी
मी बात सोडून दिली...


पहाटेच्या स्वप्नांनी माझ्या,
उष्कालाची वाट का पहावी...
मी अंधारास अधिन जाहलो
ती वात खोडून गेली...


क्षण ते चार सुखाःचे,
बघीतले नाते उमलताना...
मी सोडून दिली रीत जगाची
ती माझी जात सोडून गेली..


आयुष्याच्या या पटावर
खेळ मांडला सत्वाचा...
शिडी शोधता साप भेटले पुष्कळ
तुझ्यासाठी मी सुरवात सोडून दिली..





माझ्या "नाती-गोती" या नियोजित काव्य संग्रहासाठी लिहलेली कविता..

https://www.facebook.com/vadiyarmukesh/

No comments:

Post a Comment