असाव एक घरटं…
अजुनही एक स्वप्न
आहे,
असाव एक घरटं…
प्रयत्नाने बसवलेल्या
काट्याकुट्या
अन चीवचीव करणार
कारटं…
मी दाणे शोधुन आल्यावर
ते माझ्या पंखाखली
येईल..
माझ्या स्वप्नापरी,
लुडबूडणा-या त्या पायाने
आकाश पंखाखाली घेईल..
जरास भितीनं
खचून जाईल..
मग अलगदच स्वतः
एक आकाश रचून जाईल..
जेव्हा ते माझ्या
मना सारखं उडेल…
तेव्हा त्याच्या
पंखातही
सुर्य संपुर्ण अडेल..
मग पुन्हा एक स्वप्न
देवून जाईल माझा
डोळ्यांसाठी..!
असाव एक घरटं
माझ्या तुटून पडलेल्या
"पंखासाठी"..!!

No comments:
Post a Comment