तुला पाहिल्यावर...!!
मिटायचे राहून जातात
ओठावरचे शब्दसारे
ओठावरती राहून जातात
मी लाख झेलतो तुझे
नेत्र कटाक्ष सारे
जख्मा मात्र
मोजायच्या राहून जातात
श्वासातील वारा मंद
होवून जातो केव्हाच
मनातील वादळे मात्र
क्षमवायची राहुन जातात
योजलेल्या शब्दांना
भावनांत गुफितो मी
शब्दांच्या माळांना मात्र
गाठी मारायच्या राहुन जातात
मला जाग असते
तुला स्वप्नाता पाहिल्यावर
स्वप्ने मात्र मिटलेल्या
डोळ्यांनी पाहायची राहून जातात

No comments:
Post a Comment