शिवराई
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात जी नाणी पाडली त्याबद्दल ती केव्हा टंकसाळीत केली असावीत याबाबत अभ्यासकांत वेगवेगळी मते आढळून येतात. हि नाणी शाहाजीराजे भोसले यांचे मृत्युनंतर 1664 ला पाडली की राज्याभिषेकाच्या वेळी 1674 ला या विषयी सुस्पष्ट साहित्य अथवा संदर्भ आढळून येत नाही. त्या संदर्भात वाचन केले असता काही असे जाणवकी छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1674 लाच राज्याभिषेकावेळी सोन्याची व तांब्याची नाणी पाडली . खालील संदर्भीय पुस्तकांतील उता-यांच्या आधारे स्पष्ट करता येईल की शिवराई हे नाणे 1674 ला पाडले गेले आहे.
सद्याच्या उपलब्ध संदर्भात जेम्स ग्रॅंट डफच्या History of the Mahrattas यापुस्तकात 1664 साली शिवराई नाणे टंकसाळीत के असे नमुद केले आहे. या पुस्तकाच्य आधारेच अभ्यासकांनी या मताला दुजोरा दिला. यापुस्तकात दोन ठिकाणी शिवाजी महाराजांनी नाणी पाडल्याचा उल्लेख आहे तो खालील प्रमाणे –
#01.01
Shahjee possessed at his death, not only the districts originally conferred upon him in Jagheer, by the Beejapoor government, but the fort of Arnee, Porto Novo, and the territory of Tanjore. He continued in obedience to Ali Adil Shah, who seems to have allowed him to retain his new acquisitions unquestioned. Some days were spent by Sivajee in the observance of the usual obsequies which he performed at Singurh, where he remained for some time, and afterwards came to Raigurh. He spent some months revising and arranging the departments and affairs of his government, assisted by his principal officers; and on this occasion, first assumed the title of Raja, and struck coins in his own name.
#01.02
Sivajee, who had long struck coins, and styled himself Raja and Maha Raja, was, at this time, consulting many learned Bramins on the propriety of declaring his independence, assuming ensigns of royalty, and establishing an era from the day of his ascending the throne. A celebrated Shastree of Benares, named Gaga Bhutt, who arrived at Raigurh, and of whose coming Sivajee pretended to have an intimation from Bhowanee, was appointed to conduct the inauguration.
उपरोक्त दोन्ही उता-यांचे अवलोकन केले असता आपल्या असे लक्षात येईल तत्कालीन मोघल (मुस्लिम) शासनकर्त्याच्या रितीनुसार राजा हे पद धारण करताना नाणी पाडणे हा एक राज्याभिषेक विधीचा भाग असल्याने, जेव्हा शहाजीराजे भोसलेंचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांनी राजा हे पद धारण करुन नाणी पाडली असे जेम्स ग्रॅंट डफने ग्रहीत धरले. खालील संदर्भाच्या आधारे ते आपल्या अधिक लक्षात येईल..
#04.01
In former times the sacred Quranic credo (Kalma) used to be stamped on gold and silver coins, and such coins were constantly touched with the hands and feet of men; Aurangzib said that it would be better to stamp some other words on coins. At this time Mir * Abdul Baqi, surnamed Suhbdi, showed the following couplet of his own composition :— "King Aurangzib 'Alamgir Stamped coins, in the world, like the bright full moon."
The Emperor liked it and ordered that one face of mohars and rupees should be stamped with this verse and the other with the name of the mint-city and the year of accession (in which they would be coined). The Emperor's title on the grand seal was ordered to be engraved as Abul Zafar Muhi-ud-din Muhammad Aurangzib Bahadur 'Alamgir Padishah Ghazi.
#04.02
On Monday, the 5th April, 1680/15th Rabi. A., a letter was received from Shah 'Alam Bahadur, saying that the khatba had been read in His Majesty's name in Bijapur, and coins stamped in gold and silver in his name. The courtiers bowed to express their congratulation.
असे जरी असले जेम्स ग्रॅंट डफच्या History of the Mahrattas पुस्तकाची मराठी भाषांतरीत आवृत्ती मध्ये 1664 च्या संदर्भातील पहिला उता-यातील coin या शब्दासाठी शिक्का हा पर्यायी शब्द वापरला आहे. खालील प्रमणे
#02.01
त्यानंतर शिवाजी आपल्या बापाची क्रिया होई तोपर्यंत सिंहगडास होता; मग रायगडास जाऊन आपल्या राज्याचा बंदोबस्त करीत कांही महिने तेथें राहिला. तो बंदोबस्त झाल्यावर आपल्या नांवास ‘राजा’ असें पद जोडून आपल्या नांवाचा शिक्का चालवू लागला.
पण जेव्हा 1674 च्या संदर्भात coin म्हणजे टंकसाळी असे नमूद केले आहे.
#02.01
शिवाजी फार दिवस आपणास ‘राजा, महाराज’ असें ह्मणवीत असे; आणि आपले राज्यांत त्यांने टंकसाळ घातल्या होत्या; आणखी तो ब्रोह्मणांस ह्मणूं लागला की, ‘तुम्ही मला राज्याभिषेक करून ज्या दिवशी मी तक्ताधिपति होईन तो दिवस वर्षारंभाचा करावा.
तसेच इतरही तत्कालीन लेखकांनी coin या शब्दासाठी शिक्का हाच पर्यायी शब्द वापररला आहे.
#03.01
आपले तीर्थरूप कर्नाटकांत शिकारीस गेले असतां घोड्यावरून पडून मृत्यू पावल्याची खबर लागली नंतर त्यांची क्रिया सिव्हगडावर करून मग आपले राजगडास जाऊन आपले राज्याचा बदोबस्त करीत कांही दिवस राहून आपले नांवास राजा असें पद जोडून आपले नावें शिक्का चालवु लागले. हे वर्तमान शके 1585 सन 1664 वर्षी झाले.
जेष्ठ इतिहास संशोधक गजानन मेंहदळे आपल्या श्री राजा शिवछत्रपती पुस्तकात असे मत मांडतात की,
#05.01
शिवाजीने इ.स. 1664 मध्ये नाणी पाडली से ग्रॅंड डफचे म्हणणे आहे. पण त्याच्या त्या विधानाला त्याने काही आधार दिलेला नाही आणि ते निराधारच आहे. पुढेही, शिवाजी ब-याच काळापासून नांणी पाडत होता आणि स्वतःला राजा व महाराजा म्हणवीत होता असे म्हणून ग्रॅंड डफने पुढे शिवाजीच्या राज्याभिषेकाची हकीगत सांगितली आहे. त्याही विधानाला त्याने काही आधार दिलेला नाही आणि त्यातील नाण्यांविषयीचा भाग निराधार आहे.
त्याच प्रमाणे जेष्ठ इतिहास संशोधक व लेखक सुरेंद्र नाथ सेन असे म्हणतात की,
#06.01
Shivaji had his mint at Raigad. His first coins were not probably issued before 1674.
ख-या अर्थाने Rev. J. E. Abbott, B.A. 25 हजार च्यावर शिवराई नाण्यांचा अभ्यास करून इतर संदर्भाच्या अनुषंगाने आपले मत मांडतांना असे म्हणतो की,
#07.01
Accordingly, on the 6th of June A. D. 1674, Shivaji was again in more formal manner placed on the throne, assuming the title Kshatriya Kulavatamsa Shri Raja Siva Chhatrapati. The latter part of this title, Chhatrapati, appears on all the coins without exception.
#07.02
In Thomas McCudden’s “Oriental Eras,” 1846, page xvi, some doubt is thrown on whether Shivaji did coin in 1664. He assumes some typographical error to account for Grant Duff a assertion that Shivaji assumed the title of raja in 1664 and coined in his own name.
#07.03
As, however, Grant Duff’s statement is doubtless correct, one of the problems will be to determine what coins were issued by shivaji between 1664 and 1674.
जेष्ठ इतिहास सुरेंद्र नाथ सेन यांनी शिवराई नाणी 1674 पुर्वी पाडले नसल्याचे नमूद केले असले. व संशोधक गजानन मेंहदळे यांनी डफने दोन्ही विधानांच्यावेळी कोणताही संदर्भ न दिल्याने दोन्ही संदर्भ निराधार मानले जरी असले, तरी शिवराई ही नाणी राज्याभिषेका दरम्यान 1674 लाच पाडली आहे यांना पुष्ठी देणारे संदर्भ खालील प्रमाणे शिवकालीन पत्र सारसंग्रह भाग -1 मध्ये आढळून येतात..
#08.01
पुढे तहाच्या कलमांवर वाटाघाट होईल. मराठीत भाषांतर करून त्यांच्याकडे ती दिलेली आहेत. त्यापेकी कित्येकांवर आणि विशेषतः मुंबईची नाणी स्वराज्यांत चालू करण्याबद्दलच्या कलमांवर आक्षेप घेतला जाईल. राज्याभिषेकानंतर शिवाजी स्वतःचीच टांकसाळ काढून त्यांतील फायदा मिळविण्याचे ठरवित असल्यामुळें ह्या कलमाला संमति मिळणार नाही; असे निराजी म्हणतो.
उपरोक्त संदर्भ हा हेन्री ऑक्झिंडेन व शिवाजी महाराजांच्या तहाच्या बोलणीच्या अनुषंगाने आलेला आहे. मूळ शिवकालीन या संदर्भात इंग्रज अधिकारी शिवाजी महाराजांसमोर ज्या 20 अटी ठेवतो त्यात एक अट परस्परांची नाणी परस्परांच्या मुलखांत अप्रतिहत चालावी अशी असते. परंतू शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर स्वतःचीच टांकसाळ काढणार असल्याने नाण्यांच्या या अटीस महाराज मान्यता देणार नाहीत असे या फॅक्टरी रेकार्ड मध्ये नमूद आहे.
वरील सर्व संदर्भांचा आधार घेवून शिवराई नाणे 1674 लाच टांकसाळीत केलेली आहेत हे मान्य करता येवू शकते. या बाबीच्या पुष्ठ्यार्थ अजुनही तत्कालील अस्सल व इतरही संदर्भ आहेत. परंतु शिवराई अभ्यासकाने ते स्वतः शोधन्यात जो आनंद आहे, तो मी त्यांच्यासाठी राखून ठेवत आहे.
#01 = History of the Mahrattas – James Grant Duff Esq.
#02 = मराठ्यांची बखर (Translated from the English original of Grant Duff by David Capon)
#03 = सातारचे श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज यांचे वंशाचा व प्रतिनिधी आणि अष्टप्रधान यांचा इतिहास
#04 = MAASIR-I-ALAMGIRI
#05 = श्री राजा शिवछत्रपती (भाग-2)
#06 = Administrative system of the Marathas
#07 = A Preliminary Study of the Shivarai, or Chhatrapati
#08 = शिवकालीन पत्र सारसंग्रह भाग -1
Writer:-
https://www.facebook.com/vadiyarmukesh/
#SHIVRAI #SHIVARAI